
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
रत्नागिरी:- स्वामी स्वरूपानंद पत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून 11 संचालक बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.
राज्य कार्यक्षेत्र असलेल्या स्वामी स्वरूपानंद पत संस्थे ची निवडणूक बिनविरोध झाल्याने अँड. दीपक पटवर्धन, माधव गोगटे, जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, प्रदीप कुलकर्णी , अजित रानडे, शरदचंद्र लेले , राजेंद्र सावंत, मधुरा गोगटे , मानसी बापट, संतोष प्रभू या 11 संचालकांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे संचालक मंडळात संतोष प्रभू हे नवे संचालक समाविष्ट करण्यात आले असून कै अरविंद कोळवंणकर यांच्या जागी संतोष प्रभू हा नवा चेहेरा संचालक मंडळात समाविष्ट करण्यात आला आहे.